---Advertisement---

INDvsPAK: यावेळी पाकिस्तान करणार पलटवार? नाणेफेक जिंकत बाबरने घेतलाय गोलंदाजीचा निर्णय

---Advertisement---

आशिया चषकातील लीग सामने संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष पुन्हा एकदा सुपर 4 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागले होते. आता या सामन्याची उत्कंठा संपली आहे. रविवारी (28 ऑगस्ट) रोजी एक रोमांचक सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर आता एका आठवड्यानंतर रविवारी (4 सप्टेंबर) रोजी पुन्हाव एकदा भारत आणि पाकिस्तान संघ मैदानात उतरले. यावेळी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खानची तब्येत देखील खराब असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात एकूण तीन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा आणि आवेश खान यांना स्घातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर फिरकीपटू रवी बिश्नोई, अष्टपैलू दीपक हुड्डा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांना संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या,  भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल

‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---