आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला महासामना रंगणार आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहेत. पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळचा 238 धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काट्याची लढत होणार आहे. चाहत्यांना हा सामना अजिबात चुकवायचा नाही. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना चाहते कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात हे जाणून घ्या.
आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान भूषवणार होते. पंरतु, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड प्रकारात खेळावली जात आहे. यातले 4 सामने पाकिस्तानात तर, उर्वरीत 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
भारत आणि पाकिस्तानचा लाइव्ह सामना पहा या ठिकाणी
आशिया कप 2023 मधील भारतविरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईल ऍप हॉटस्टारवर पाहता येईल, तर सामन्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. जर चाहत्यांनी आशिया कप मोबाईल ऍप हॉटस्टारवर पाहिला तर त्यांना त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु जर हा सामना लॅपटॉप किंवा टीव्हीच्या ऍपवर पाहायचा असेल तर त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
आशिया चषकत भारत आणि पाकिस्तान सामन्यांचे आमने-सामने रेकॉर्ड
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातले भारतीय संघाने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. यातल्या एका सामन्याचा निकाल लागला नाही.
आशिया चषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा नेहमीच दबदबा राहिला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे 15 हंगाम झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010,2016 आणि 2018) विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, त्यंनी 6 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. ( india vs pakistan where and how to match watch live streaming asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशभरातून 1200 खेळाडू सहभागी
डेवाल्ड ब्रेविसचे आंतरराष्ट्रीय पदार्पणात अपयशी! अष्टपैलू हिरोवरून झिरोवर