मलेशियात सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या गुणतालिकेत सध्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. या दोन्ही संघांनी या स्पर्धेत अात्तापर्यंत प्रत्येकी 3 सामने जिंकले असून फक्त एका सामन्यात पराभव पत्करला आहे.
उद्या होणाऱ्या या सामन्यात जो संघ विजेता ठरेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल तर पराभूत संघाला आजच होणाऱ्या बाकी संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
दोन्ही संघांनी या स्पर्धेत आत्तापर्यंत मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवले आहेत तर त्यांना बांग्लादेशने पराभवाचा धक्का दिला आहे.
या सामन्याला उद्या सकाळी 7 वाजता सुरवात होणार आहे. हा सामना प्रेक्षकांना हॉटस्टारवरून पाहता येणार आहे.
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण






