भारताचा कसोटी संघ (team india) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. कसोटी मालिकेची सुरुवात बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने आगामी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सराव सत्राचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याला मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
यापूर्वी विराट आणि द्रविड यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. या दौऱ्यापूर्वी द्रविड कर्णधार विराटसोबत पत्रकार परिषदेलाही गेले नव्हते. मात्र आता या व्हिडिओनंतर या चर्चांवर पूर्णिविराम लागेल.
पहिला कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेतील सेंचुरियन स्थित सुपर स्पोर्ट पार्कमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ यापूर्वी दोन वेळा या मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना पराभूत झाला आहे. यावेळी मात्र संघाला ही चूक पुन्हा करायची नाहीय. विराट कोहलीने त्याच्या मागच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले होते. पहिला कसोटी सामना या मैदानावर आयोजित केला जाणार आहे, त्या ठिकाणी विराटने यापूर्वी १५३ धावा केल्या होत्या.
भारतीय संघ मागच्या वेळी जेव्हा सुपर पार्क स्टेडियमवर खेळला होता, त्यावेळी विराटने चांगली खेळी केली असली, तरी संघाला पराभव पत्करावा लागला होता. अशात विराटने या आगामी सामन्यात देखील तशीच खेळी करावी, ही मुख्य प्रशिक्षकांसोबतच सर्वाची इच्छा आहे. याच कारणास्तव राहुल द्रविड विराट कोहलीला खास मार्गदर्शन करत आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत द्रविड विराटला फलंदाजीविषयी काही सल्ले देताना दिसत आहेत. या दोघांनी नेटमध्ये बराच वेळ एकत्र घालवला.
Getting Test-match ready 👌 👌
🎥 Snippets from #TeamIndia's first practice session ahead of the first #SAvIND Test. pic.twitter.com/QkrdgqP959
— BCCI (@BCCI) December 19, 2021
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत विराट आणि द्रविड रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर खेळाडूंसोबत बसमधून बाहेर येताना दिसत आहे. राहुल द्रविडसाठी विदेश दौऱ्यातील ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. अशात परदेशी दौऱ्याची सुरुवात चांगली करण्यासाठी ते विराटसह संघातील इतर खेळाडूंना देखील मार्गदर्शन करताना दिसत आहेत. विराट प्रशिक्षकांनी दिलेला सल्ला लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसत आहेत.
Batting prep on track in Centurion 🏟️ ahead of the 1st Test 💪🏻💥#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/BMpnFhyaoW
— BCCI (@BCCI) December 19, 2021
— BCCI (@BCCI) December 19, 2021
विराट कोहलीने मागच्या बऱ्याच दिवासंपासून अपेक्षित प्रदर्शन केलेले नाही. अशात त्याला संघासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी खेळी करणे गरजेचे असणार आहे. मागच्या दोन वर्षांपासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय शतक केले नसून चाहत्यांना त्याच्याकडून दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळीची अपेक्षा आहे. बीबीसीआयच्या व्हिडिओत विराट खूप उत्साहात दिसत आहे, पण सामन्यात त्याचा हा उत्साह टिकून राहतो की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: युवा महाराष्ट्रासमोर आज पंजाबचे तगडे आव्हान
गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीत जिमीने रचला इतिहास! वाचा सविस्तर
पेहचान कोण? कांबळींनी शेअर केला युवा वयातील फोटो, सचिनला सोडून इतरांना ओळखणं महाकठीण