दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (Virat Kohli Resigns) दिला आहे. यानंतर आता भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते नव्या कर्णधाराच्या (New Test Captain) शोधात आहेत. कसोटी संघनायकाच्या शर्यतीत विद्यमान उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासह केएल राहुल (KL Rahul) हादेखील आघाडीवर आहे. नुकतीच राहुलने कसोटी संघाच्या नेतृत्वाची कमान सांभाळण्यासाठी आपण इच्छुक असल्याचेही (KL Rahul Wants To Lead Test Team) म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याजागी राहुल संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने पहिल्यांदाच नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, मला जोहान्सबर्गमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. तो क्षण खूप विशेष होता. मी त्या एकाच सामन्यातून खूप काही शिकलो. आम्हाला तो सामना जिंकता आला नाही पण मला अभिमान आहे की मी संघाचे नेतृत्त्व केले. देशाचे नेतृत्त्व करणे हा सर्वांसाठीच सन्मानाचा क्षण असतो. जर मला ही संधी मिळाली तर मी नक्कीच संघाला पुढे घेऊन जाईल.
कर्णधार म्हणून राहुलकडे नाहीत कोणत्याही योजना
पत्रकार परिषदेत राहुलला वनडे मालिकेत कर्णधार म्हणून त्याच्या योजनांबाबत विचारण्यात आले. ज्याचे उत्तर त्याने नाही असे दिले आहे. राहुल म्हणाला की, माझ्याकडे कोणतीही योजना नाही. माझे कोणतेही लक्ष्य नाही. मी एका सामन्यात एकच लक्ष्य ठेवून चालणारा व्यक्ती आहे.
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, विराट कोहली आणि एमएस धोनीने संघाला पुढे नेले आहे. आमचा पॅटर्न सेट आहे. आमचा संघ नेहमी विजयासाठी आसुसलेला असतो आणि आम्हाला नेहमी सुधारणेसाठी वाव असतो. आम्ही आताही सुधारासाठी मेहनत करत आहोत. कर्णधार म्हणून मी प्रत्येक खेळाडूला सहयोग करू इच्छित आहे आणि त्यांना चांगल्या प्रदर्शनासाठी प्रेरित करू इच्छितो.
महत्त्वाच्या बातम्या-
पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पार्टी करत होता जो रूट, तितक्याच आले पोलिस अन्…, बघा व्हिडिओ
सचिनसोबत विक्रमी भागीदारी, ७ सामन्यात दोन द्विशतके, तरी कांबळीची अवघ्या २ वर्षात संपली कारकीर्द
हेही पाहा-