---Advertisement---

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 12:52 AM
centurion-ground
---Advertisement---

विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारतीय कसोटी संघ (indian test team) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्याची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतीय संघ मागच्या तीन-चार दिवसांपासून आगामी कसोटी मालिकेसाठी तयारीला लागला आहे. राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या मार्गदर्शनात रोज संघाचे सराव सत्र घेतले जात आहे. पण अशातच एक खराब बातमी समोर आली आहे.

उभय संघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंचुरीयनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान नैसर्गिक अडथळा उभा राहण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मोठा पाऊस होईल, अशी शक्यता सांगितली जात आहे. हवामानाच्या वेबसाईटनुसार सेंचुरीयनमध्ये पहिल्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांपैकी चार दिवस पाऊस येऊ शकतो.

हवामान सांगणारी वेबसाईट एक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार, सेंचुरियनमध्ये २६ आणि २७ डिसेंबरला मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी पावसासोबत जोरदार वाऱ्याचाही अंदाज व्यक्त केला गेला आहे. हवामान अंदाजानुसार २७ डिसेंबरच्या दुपारी जोरदार पाऊस होईल. त्यानंतर २८ आणि ३० डिसेंबरच्या दुपारी वादळी वाऱ्याचा अंदाज सांगितला गेला आहे. हवामानाच्या या अंदाजानुसार असे दिसते की, भारतीय खेळाडूंना या पावसाच्या वातावरणातून विजयाचा मार्ग शोधावा लागेल.

पहिल्या कसोटीसाठी वर्तवल्या गेलेल्या हवामान अंदाजानुसार असे वाटते की, संघातील फलंदाजांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी अडचण होईल. आकाशात आभाळ आणि हवेत दमटपणा असल्यामुळे पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. अशात भारताच्या वेगवान गोलंदाजांवर देखील महत्वाची जबाबदारी असेल. तर विराट, पुजारा आणि रहाणे या फलंदाजांना काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागेल.

तत्पूर्वी, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने काही कडक निर्बंध लावले आहेत. उभय संघात खेळल्या जाणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी दिली गेली नाही. कोरोनाचा नवीन विषाणू ऑमिक्रॉन आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बोर्डला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

 

महत्वाच्या बातम्या –

काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’

पाकिस्तानविरुद्धच्या एका चौकाराने ‘या’ क्रिकेटरला बनवले होते हिरो, आता ‘टीम इंडिया’ला देणार प्रशिक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---