---Advertisement---

वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग? वरिष्ठांना विश्रांती देत ऋतुराजसह ‘या’ खेळाडूंना देणार संधी

On: रविवार, जानेवारी 23, 2022 11:32 AM
india-practice
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत पाहुणा संघ पिछाडीवर आहे. सुरुवातीचे सलग २ सामने गमावल्याने भारतीय संघ वनडे मालिकेत ०-२ ने मागे आहे. यानंतर रविवार रोजी (२३ जानेवारी) उभय संघ तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यासाठी (Third ODI) आमने सामने येणार आहेत. हा सामना जिंकत भारतीय संघ व्हाईटवॉशपासून वाचण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला (Changes In Playing Xi) मिळण्याची शक्यता आहे. 

विराटला विश्रांती तर ऋतुराजला संधी!
या सामन्यात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) सहित जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघ प्रशिक्षक राहुल द्रविड तिसऱ्या वनडेत युवा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला संधी देऊ शकतात. त्यामुळे तो शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. त्यामुळे कर्णधार केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरू शकतो. जेणेकरून मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असल्यास राहुल भारताकडून फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. तसेच फलंदाजीसाठी भारताकडे अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि दिपक चाहर (Deepak Chahar) यांचेही पर्याय उपलब्ध असतील.

व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले

दिपक चाहरही असेल प्लेइंग इलेव्हनचा भाग!
तसेच गोलंदाजीतही चाहरला आपला दम दाखवण्याची संधी मिळू शकते. याशिवाय पहिल्या २ वनडे सामन्यात अपेक्षित प्रदर्शन न करू शकलेला भुवनेश्वर कुमार याला अजून १ संधी दिली जाऊ शकते. दुखापतीमुळे पहिल्या २ सामन्यांना मुकलेला मोहम्मद सिराजही तिसऱ्या वनडेतून संघात पुनरागमन करू शकतो. तसेच फिरकी विभागात अश्विन आणि चहल यांच्यापैकी एकाला खेळवले जाऊ शकते. त्यातही चहलने मागील सामन्यात खूप चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्याला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India’s Predicted Playing Xi)-
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), वेंकटेश अय्यर, दिपक चहर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

महत्त्वाच्या बातम्या-

ऑल सेट! ‘या’ दिवशी सुरू होणार आयपीएल २०२२ ची रणधुमाळी, जय शाह यांनी केली घोषणा

दक्षिण आफ्रिकेला नाही पचला वनडे मालिका विजय! आयसीसीने कर्णधारासहित पूर्ण संघावर ठोठावला दंड

दुसऱ्या वनडेत रिषभने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागे ‘ही’ होती योजना, स्वत: केला उलगडा

हेही पाहा-

अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले | Sachin | Dravid |  Kallis |

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---