---Advertisement---

भारताचं नशीबं गंडलयं राव! पुन्हा एकदा टॉस जिंकत आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

On: रविवार, जून 19, 2022 6:36 PM
Rishabh Pant Toss
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी२० सामना रविवारी (१९ जून) बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेत सध्या दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीवर असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही हातून निसटेल. मात्र, सामना जिंकल्यास पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास पहिल्यांदा घरच्या धर्तीवर भारत आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकण्यास यशस्वी ठरू शकतो. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता उभय संघात नाणेफेक झाली असून पुन्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

भारतानने या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे पहिल्या दोन सामन्यात पराभव मिळवल्यानंतर संघाने चांगले पुनरागमन करत मालिकेत बरोबरी सादली त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास या सामन्यात सकारात्मक दिसू शकतो. दुसरीकडे मात्र दक्षिण आफ्रिकेने संघात होन बदल केले आहेत. संघाचा क्रणधार टेम्बा बवुमा याला चौथ्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी संघात रिजा हैन्रिक्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कगिसो रबाडा आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

असे आहेत दोन्हीही संघ

भारत- ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिका- केशव महाराज (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिजा हेन्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्केया

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘तो चांगला खेळाडू कस काय?’ पंतच्या खेळावर बॉलिवुड अभिनेत्याने उचलले प्रश्नचिन्ह

दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजा नवीन सुरुवात करण्यासाठी तयार, शेअर केला खास फोटो

दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---