---Advertisement---

आता दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार २३ वर्षांचा खेळाडू

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी वनडे आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याजागी आइडें मार्करमला प्रभारी कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

तो दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील १९९१ पासूनचा १३वा कर्णधार ठरणार आहे. डुप्लेसीने आजपर्यंत १३ वनडेत संघाचं नेतृत्व केलं असून त्यात संघाला ११ विजय मिळवून दिले आहे.

तो ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतही नेतृत्व करणार असून तो दक्षिण आफ्रिकेचा टी२० मध्ये नेतृत्व करणारा १०वा कर्णधार ठरणार आहे.

आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलिअर्स पूर्वीच या मालिकेतून बाहेर पडला आहे नाहीतर त्याकडे कसोटीप्रमाणे प्रभारी कर्णधारपदाची जबादारी देण्यात आली असती. झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी मालिकेत फाफ डुप्लेसी जखमी झाल्यावर डिव्हिलिअर्सने जबाबदारी पार पाडली होती.

आइडें मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०१४मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंतच्या इतिहासात हाच एकमेव विश्वचषक जिंकला आहे.

त्याचे सध्या वय केवळ २३ वर्ष आहे. त्याच्या कर्णधारपदावरील नियुक्तीमुळे दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटप्रेमींना ग्रॅमी स्मिथच्या २२ व्या वयातील नियुक्तीची नक्कीच आठवण आली असणार.

https://www.instagram.com/p/Bes8x-TAlsJ/?utm_source=ig_embed

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment