---Advertisement---

RCBचा लाजिरवाणा विक्रम! IPLमधील ‘पराभवांचे बादशहा’ ठरले

On: शुक्रवार, एप्रिल 11, 2025 7:59 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यातील सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये आरसीबीला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाज आणि फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे आरसीबीला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या गोलंदाजांनी खूप धावा दिल्या आणि केएल राहुलविरुद्ध ते पूर्णपणे अपयशी ठरले. आता एकाच आयपीएल मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत आरसीबीने सर्व संघांना मागे टाकले आहे आणि या पराभवासह ते वाईट यादीत वरच्या स्थानावर पोहोचले आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर, आरसीबी आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने बेंगळुरूमध्ये एकूण 45 सामने गमावले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने दिल्लीमध्ये 44 सामने गमावले आहेत. एकाच ठिकाणी सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकात्याच्या मैदानावर केकेआरने एकूण 38 आयपीएल सामने गमावले आहेत.

एकाच आयपीएल मैदानावर सर्वाधिक सामने गमावलेले संघ:

| संघ: आरसीबी | गमावलेले सामने: 45| ठिकाण: बंगळुरू |
| संघ: दिल्ली कॅपिटल्स | गमावलेले सामने: 44| ठिकाण: दिल्ली |
| संघ: कोलकाता नाईट रायडर्स | गमावलेले सामने: 38 | ठिकाण: कोलकाता |
| संघ: मुंबई इंडियन्स | गमावलेले सामने: 34 | ठिकाण: मुंबई |ॉ

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सनं टार्गेटचा पाठलाग करताना खराब सुरुवात केली. फाफ डु प्लेसिस, जैक फ्रेझर मॅक्गर्क आणि अभिषेक पोरेल लवकर बाद झाले. मात्र चौथ्या क्रमांकावर आलेल्या केएल राहुलने 53 चेंडूत 93 धावा ठोकत एकहाती सामना जिंकून दिला. त्याला ट्रिस्टन स्टब्सकडून 38 धावांची साथ मिळाली.

आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी करत 26 धावांत 2 विकेट घेतल्या. पण यश दयाल (45 धावा) आणि जोश हेजलवूड (40 धावा) महागडे ठरले. त्याआधी आरसीबीकडून फिल सॉल्ट आणि टिम डेविडने 37-37 धावा केल्या, रजत पाटीदारने 25 धावा जोडल्या. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले आणि आरसीबी फक्त 163 धावांवरच थांबली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---