भारतीय संघ सध्या आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे (india tour of south africa 2022). भारताला या मालिकेत तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन मालिका खेळायच्या आहेत. परंतु दक्षिण अफ्रिकेत सध्या कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनला प्रसार वेगाने होत आहे. अशात दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डने आगमी मालिकेसाठी काही कडक निर्वंध लावले आहेत. उभय संघात पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी होणार आहे. अशातच माहिती समोर आली आहे की, या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नसणार आहे.
उभय संघातली पहिला कसोटी सामना सेंचुरियनमधील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये खेळला जाणार आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळणार नाही. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लावले आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये तिकीट विक्री देखील बंद आहे आणि यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, पहिल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडिममध्ये परवानगी नाकारली जाण्याची शक्याता आहे. सुपरस्पोर्ट्स स्टेडियमच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले गेले आहे की, यावेळी हे स्पष्ट नाहीय की, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी असेल की नाही. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही पुढची घोषणा करू.
तत्पूर्वी, विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वाखालील भारताचा कसोटी संघ आगामी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी तयारीला लागला आहे. संघाने दक्षिण अफ्रिकेतील विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे आणि सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज संघाचे सराव सत्र घेतले जात आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून संघाच्या सराव सत्राचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी आणि ११ जानेवारील या तारखेला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याची सुरुवात होईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारीला खेळला जाणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला दुसरा आणि २३ जानेवारीला तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: हरियाणा स्टीलर्सने ‘या’ स्टार रेडरला बनवले कर्णधार, पाहा त्याची आकडेवारी