जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतून घरी परतला होता, पण तो आता पुन्हा संघात सामील झाला आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन (Sanju Samson) चौथ्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज होता, मात्र धुक्यामुळे तो सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला. आता या यष्टीरक्षक फलंदाजाचे पुनरागमन शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात होऊ शकते.
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने कटकमध्ये पहिल्या सामन्यात आणि धर्मशालामध्ये तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तसेच न्यू चंदीगड येथील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला.
अहमदाबादमध्ये भारत मालिका 3-1 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर पाहुणा संघ मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरेल. संजू सॅमसन शुबमन गिल जखमी झाल्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गिलच्या अनुपस्थितीत संजू, अभिषेक शर्मासोबत सलामीला (Open) येऊ शकतो. बुमराह परतल्यामुळे हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे 10 आणि 27 धावा करणाऱ्या जितेश शर्माला संजूच्या पुनरागमनामुळे अंतिम 11 मधून वगळले जाण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका संघ: रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडन मार्करम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटेनिल बार्टमन.






