भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगावन गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम प्रदर्शन केले. अशात दक्षिण अफ्रिकेचे माजी फलंदाज डॅरिल कलिनन (daryell cullinan) याने मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. कलिननने यावेळी शमीची तुलना दक्षिण अफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक आणि इंग्लंडच्या जेम्स अँडरसनशी केली.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना संचुरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळला जात आहे. मोहम्मद शमीने या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेचे पाच महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ १९७ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने सामन्यात मोठी आघाडी घेतली.
सामन्याच्या पहिल्या डावातील शमीचे प्रदर्शन पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज कलिननने शमीचे कौतुक केले आहे. कलिनन म्हणाला की, “त्याची (शमी) सीम पोजिशन खूप चांगली आहे. त्याला फलंदाजी करताना मला शॉन पोलॉक आणि जेम्स अँडरसनची आठवण आली. तो सतत लहान-लहान बदल आणि योग्ज सीम पोजिशनसोबत गोलंदाजी करतो.”
दरम्यान, उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवसापासून वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ विकेट्सच्या नुकसानावर २७२ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवशी ३२७ धावा करून भारतीय संघ सर्वबाद झाला. यामध्ये दक्षिण अफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीने सर्वात्ताम प्रदर्शन करून सहा विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे भारताचा केएल राहुलने १२३ धावांची खेळी केली.
दक्षिण अफ्रिके संघ त्यांच्या पहिल्या डावाच १९७ धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये भारताच्या मोहम्मद शमीने सर्वोत्तम गोलंदाजी केली. शमीने टाकलेल्या १६ षटकांमध्ये ४४ धावा खर्च केल्या आणि ५ महत्वाच्या वेकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने स्वतःच्या कसोटी क्रिकेटमधील २०० विकेट्सही पूर्ण केल्या.
त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या १७४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. आता दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या डावाच ३०५ धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन दिगज म्हणतोय, “भारतात कसोटी मालिका जिंकूनच निवृत्त होईल!”
ऍशेस गमावलेल्या इंग्लंडला वॉर्नरने दिला ‘फुकटचा सल्ला’; म्हणाला…
‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे
व्हिडिओ पाहा –