भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज, शनिवार, 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात रोहितने संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शेवटचा बदल केला होता, ज्यामध्ये मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादव आला होता. आता विजेतेपदाच्या लढतीत शिवम दुबेच्या रूपाने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या बदलामुळे सलामीच्या जोडीमध्येही फेरबदल होऊ शकतात. वास्तविक, अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा शिवम दुबेला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासून दुबे प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
अष्टपैलू दुबे आतापर्यंत फक्त फलंदाज म्हणून खेळला आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 1 षटक टाकले. तर दुबेला फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. पण त्याने फिरकीपटूंविरुद्ध काही मोठे फटके नक्कीच मारले आहेत, पण वेगवान गोलंदाजांसमोरही तो कमकुवत दिसत आहे.
दुबेचा खराब फॉर्म लक्षात घेता यशस्वी जयस्वालला अंतिम फेरीत संधी मिळू शकते. या टी20 विश्वचषकात जयस्वालने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. जयस्वाल प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला तर तो रोहित शर्मासोबत सलामी करु शकतो. तर आतापर्यंत ओपनिंग करणारा विराट कोहली आपल्या जुन्या नंबर तीनवर परत येऊ शकतो. आता अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टी20 विश्वचषक 2024 फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
महत्तवाच्या बातम्या-
हेड कोच म्हणून राहुल द्रविडचा शेवटचा सामना, ट्राॅफी जिंकून रोहित सेना देणार फेअरवेल गिफ्ट?
IND vs RSA: चाहत्यांसाठी डोकेदुखी! आयसीसी फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड खूपच खराब
क्रिकेट विश्वात खळबळ! फायनलपूर्वी टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय