सेन्चुरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा रागाचा पारा चांगलाच चढलेला दिसला. काल जेव्हा पावसामुळे सामना थांबला तेव्हा विराट नाराज दिसत होता.
जेव्हा पाऊस थांबल्यावर सामना पुन्हा सुरु झाला तेव्हा ५ षटके खेळल्यावर सामना पुन्हा थांबला. यावेळी सामना थांबवायला खराब प्रकाश हे कारण देण्यात आले.
तत्यामुळे कर्णधार कोहली रागानेच मैदानातून बाहेर गेला. तसेच थेट सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या रूममध्ये जाऊन नाराजगी व्यक्त केली.
भारतीय संघ आजपर्यंत कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकला नाही. यावेळी मोठी संधी चालून आली आहे. चांगला खेळ केला तर संघ ही मालिका जिंकू शकतो. परंतु पावसामुळे असाच सामन्याचा वेळ वाया गेला तर टीम कोहलीचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणे अवघड दिसत आहे.
Video:
https://twitter.com/iamkhurram12/status/952918841247453185