केप टाउन । भारतीय क्रिकेट संघाला काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे गेले अनेक दिवस यशाच्या शिखरावर असणाऱ्या आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या कर्णधार कोहलीला जोरदार टीकेला सामोरे जावे लागले.
या अपयशात सर्वात जास्त टीका जर कोहलीवर कशामुळे झाली असेल तर ती अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान न देण्यावरून. अजिंक्य रहाणे हा भारतीय संघाचा उपकर्णधार असून परदेशी खेळपट्टीवर चांगली कामगिरी केलेला खेळाडू आहे. असे असतानाही त्यावर विश्वास न दाखवता रोहित शर्माला संघात स्थान दिल्यामुळे विराट जोरदार टीकेचा धनी झाला.
याबद्दल सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला, ” आम्ही सध्याच्या फॉर्मचा विचार केला. रोहित सध्या चांगली कामगिरी करत होता. शिवाय त्याने गेल्या ३ कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संधी देण्यात आली. “
विडिओ:
Not every day the vice-captain who is also an exceptional batsman, is dropped. What was the logic? Here’s @imVkohli with the answer #SAvIND pic.twitter.com/6VqDeUrVFI
— Anand Vasu (@anandvasu) January 8, 2018