लखनऊ। श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून त्यांना यजमान भारतीय संघाबरोबर ३ सामन्यांची टी२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यातील टी२० मालिकेला गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. टी२० मालिकेनंतर कसोटी मालिका होईल.
दरम्यान, या टी२० मालिकेत भारतीय संघ टी२० क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा संघ म्हणून खेळेल. त्याचबरोबर भारतीय संघ हे अव्वल स्थान मजबूत करण्याचाही या टी२० मालिकेत प्रयत्न करेल.
भारतीय संघात होणार अनेक बदल
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) टी२० मालिकेसाठी (T20I Series) जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, संजू सॅमसन अशा खेळाडूंचे भारताच्या संघात पुनरागमन झाले आहे, तर विराट कोहली आणि रिषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव हे दोन खेळाडू दुखापतीमुळे ही मालिका खेळणार नाही. त्याचमुळे भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होणे निश्चित आहे.
याबरोबरच श्रीलंकेलाही या मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा हुकमी एक्का असलेला वनिंदू हसरंगा कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे.
आमने-सामने कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका संघात २२ सामने झाले आहेत. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच ७ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना २४ फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना कुठे खेळवला जाणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना किती वाजता सुरु होणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
५. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रोहित शर्मा(कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक हुडा, आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव युझवेंद्र चहल.
श्रीलंका – पाथम निसांका, दनुष्का गुनाथिलाका, कामिल मिश्रा(यष्टीरक्षक), दिनेश चंडीमल, चारिथ असलंका, दासुन शनका(कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरस, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, जेनिथ लियानागे, अशियन डॅनिल, शिरन फर्नांडो, बिनुरा फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या –
द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी
आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास
‘सुट्टी तेव्हाच घेईल, जेव्हा…’, म्हणत रोहित शर्माने दिले बायो-बबलच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर