रविवार (दि. 17 सप्टेंबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठीही खूपच महत्त्वाचा आहे. कारण, या दिवशी आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना गजविजेत्या श्रीलंका विरुद्ध भारत संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. अशात या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सामन्यापूर्वी सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे की, सामन्यादरम्यान पाऊस पडेल का? भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणे या सामन्यातही पाऊस एन्ट्री करू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला जेव्हापासून सुरुवात झाली आहे, तेव्हापासून श्रीलंकेत जोरदार पाऊस पडत आहे. याचा फटका सामन्यांनाही बसला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील पहिला सामनाही पावसामुळे धुवून निघाला होता. यानंतर दोन्ही संघातील दुसऱ्या सामन्यातही पावसाने एन्ट्री केली. त्यामुळे सामन्याचा निकाल राखीव दिवशी लागला. याव्यतिरिक्त पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामनाही पावसामुळे 42 षटकांचा करण्यात आला होता.
कोलंबोमध्ये दुपारी पावसाची शक्यता
अशात हा प्रश्न आहे की, अंतिम सामन्यादरम्यानही पाऊस पडू शकतो का? हवामान विभागानुसार, दुपारी 3 नंतर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा सामना सुरू होईल, तेव्हा पाऊसही पडेल. मात्र, कोलंबोमध्ये आता हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे आणि ऊनही निघाले आहे. याव्यतिरिक्त मागील दिवसाबद्दल बोलायचं झालं, तर पाऊस आला नव्हता. भारत आणि बांगलादेश संघातील सामनाही कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळला गेला होता. शनिवारीच्या दिवशी कोलंबोत पाऊस पडला नव्हता. तसेच, आज सकाळचे वातावरणही स्वच्छ आहे. आता सायंकाळपर्यंत पाऊस पडतो की नाही, हे पाहावे लागेल.
Sun shining in Colombo….!!!!
Great news for cricket fans for the final. [News24Sports] pic.twitter.com/8LS98M12rW
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
दोन्ही संघ सज्ज
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघ आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहेत. मात्र, पावसामुळे सामना आज खेळवला गेला नाही, तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. कोट्यवधी क्रिकेटप्रेमी कदाचित कोणत्याही अडथळ्याशिवाय हा सामना पार पडावा, अशी प्रार्थना करत असतील. (india vs sri lanka asia cup 2023 final colombo weather report read here fast)
हेही वाचा-
भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी, भारताकडून खेळला फक्त 4 वनडे अन् 1 टी20
व्हायचे होते वेगवान गोलंदाज, पण झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू; नाम तो सुना होगा- R Ashwin