27 वर्षांनंतर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांच्या धर्तीवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या वनडे मालिकेत टीम इंडियाचा 0-2 असा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच तापला आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
खरं तर भारताने याआधी ऑगस्ट 1997 मध्ये श्रीलंकेच्या भूमीवर यजमान संघाविरुद्ध वनडे मालिका गमावली होती. ऑगस्ट 1997 मध्ये श्रीलंकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 3-0 असा पराभव केला. तब्बल 27 वर्षांनंतर श्रीलंकेने भारताकडून त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने कबूल केले की आपले खेळाडू फिरकीला अनुकूल परिस्थितीत मात देऊ शकले नाहीत. आता परिस्थितीनुसार प्लेइंग इलेव्हन निवडण्यात मागे राहणार नाही, असे संकेत रोहित शर्माने दिले. रोहित शर्मा म्हणाला, ‘अशा खेळपट्ट्यांवर कोणते खेळाडू खेळू शकतात याचा विचार करायला हवा. पण त्यासोबत तुम्हाला खेळाडूंना सातत्यपूर्ण संधीही देणे आवश्यक आहे, कारण एक किंवा दोन प्रसंगी चांगली कामगिरी करणे सोपे नसते. ही एक वाईट मालिका होती आणि ती आम्हाला स्वीकारावीच लागेल.
पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘आमच्याकडून कुठे चुका झाल्या हे स्वीकारावे लागेल. आम्ही फिरकीपटूंविरुद्ध जास्त आक्रमकता दाखवू शकलो नाही आणि श्रीलंकेने आमच्यावर सतत दबाव टाकला, ‘आम्ही यापूर्वीही अशा समस्यांचा सामना केला आहे, जेव्हा चेंडू थोडा फिरत होता. मी पाहतो की खेळाडू नेटमध्ये कठोर प्रशिक्षण घेत आहेत आणि ते वेगवेगळे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्हाला लय कशी राखायची हे माहित असणे आवश्यक होते. आम्ही तीन वेळा अपयशी ठरलो. बरोबरीत राहिलेला पहिला सामना आम्ही जिंकायला हवा होता.
अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकांच्या बळावर, ड्युनिथ वेलालगेच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीमुळे श्रीलंकेने बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत भारताचा 110 धावांनी पराभव करून मालिका 2-0 ने जिंकली. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना 32 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा-
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘विनेश फोगट’ला मिळणार या सर्व सुविधा, जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
“तू हरली नाहीस.. तूला हरवलं..”, विनेश फोगटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनियाचे मोठे वक्तव्य