---Advertisement---

IND vs SL पहिला सामना जिंकून भारताची विजयी सलामी, सूर्यकुमारचं झंझावाती अर्धशतक

On: शनिवार, जुलै 27, 2024 10:43 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं 43 धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी श्रीलंकेनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलंं. प्रत्युत्तरात भारतानं 7 गडी गमावून 213 धावा ठोकल्या. भारतानं दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 170 धावांवरती सर्वबाद झाला.

भारतासाठी फलंदाजी करताना सलामी जोडीनं भारताला धमाकेदार सुरुवात करुन दिली. शुबमन गिल (Shubman Gill) 37 धावा, यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) 40 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 223.08च्या स्ट्राईक रेटसह 26 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 8 चौकारांसह 2 षटकार ठोकले. तर रिषभ पंतनं (Rishabh Pant) 33 चेंडूत 49 धावांची उत्कृष्ट खेळी केली.

भारतासाठी गोलंदाजी करताना रियान परागनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतानं श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. 

पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

महत्त्वाच्या बातम्या-

पॅरिस ऑलिम्पिक : चिराग-सात्विकनं पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
IND vs SL; पहिल्याच सामन्यात सूर्या चमकला, ठोकले झंझावाती अर्धशतक
पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---