---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर

On: गुरूवार, डिसेंबर 29, 2022 2:38 PM
Suryakumar Yadav & Rohit Sharma vs SL
---Advertisement---

भारतीय पुरुष क्रिकेट संघ 2023 वर्षाची सुरूवात घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळून करणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारताचे संघ मंगळवारी (27 डिसेंबर) जाहीर झाले आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या टी20 आणि रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. हे सहा सामने कधी, कुठे खेळले जाणार आणि त्यांची वेळ काय असणार हे सर्व जाणून घेऊ.

श्रीलंकेच्या या दौऱ्याची सुरूवात टी20 मालिकेने होणार आहे. यातील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये, दुसरा सामना 5 जानेवारीवा पुण्यात आणि तिसरा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळ 7 वाजता सुरू होणार आहेत.

टी20 मालिकेनंतर वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी, दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकाता आणि शेवटचा तिसरा सामना 15 जानेवारीला तिरूअनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी खेळले जाणार आहेत.

भारतात या दोन्ही मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर होणार आहे. मोबाईल आणि लॅपटॉपसाठी डिज्नी प्लस हॉटस्टार हा पर्याय आहे.

टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारताचा संघ- हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.

श्रीलंकेचा संघ- दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्व्हा, वानिंदू हसरंगा, चमिका करूणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, महीश तीक्क्षणा, दिलशान मदुशंका, कसुन रजिथा, दुनिथ वेल्लालागे, प्रमोद मदुशान, लाहिरू कुमारा, नुवान थुशरा.

वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

श्रीलंकेचा संघ- दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, नुवानीदू फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्व्हा, चमिका करूणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, अशेन बंदारा, महीश तीक्क्षणा, दिलशान मदुशंका, कसुन रजिथा, दुनिथ वेल्लालागे, प्रमोद मदुशान, जेफरी वंदर्से लाहिरु कुमारा

(India vs Sri Lanka T20 & ODI Series, Teams and full time table)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जुने इंजिन काढणार! श्रीलंकेविरुद्ध निवडलेल्या संघातून बीसीसीआयचे उद्दिष्ट स्पष्ट, आता नेतृत्व युवा खेळाडूंकडे
बांगलादेशच्या फलंदाजावर निराश अश्विन! म्हणाला, ‘मला वाटले तू कोहली-विल्यमसनसारखा असणार मात्र…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---