IND vs SL, T20 Series :- भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. (27 जुलै) रोजी दोन्ही संघ पहिल्या टी20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाला एक धक्का बसला आहे.
टी20 मालिकेतील पहिला सामना सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा दुखापतग्रस्त झाला आहे. भारतीय संघाच्या सराव सत्रात सिराज याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे सिराज पहिल्या सामन्याला मुकणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यापासून तो उपलब्ध होईल. सिराज मागील महिन्यात झालेल्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.
सिराज या सामन्यात न खेळल्यास त्याच्या जागी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याला संधी मिळू शकते. त्यामुळे या सामन्यात अर्शदीप सिंग व खलील ही वेगवान जोडी खेळताना दिसेल. तर, अष्टपैलू हार्दिक पंड्या हा वेगवान गोलंदाजीचा तिसरा पर्याय असेल. फिरकीपटू म्हणून रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीची बाजू सांभाळताना दिसणार आहे. याच मालिकेतून गौतम गंभीर हा प्रशिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू करेल.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होईल. हे सर्व सामने पल्लेकले येथे खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
हेही वाचा –
शुबमन गिलचं प्रमोशन! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटी संघातही मिळू शकते मोठी जबाबदारी
नीता अंबानींची पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड
पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा