---Advertisement---

विराट कोहली आणि टीम इंडियाकडून शिकण्याचा विंडिजला फायदा होईल

On: रविवार, ऑक्टोबर 7, 2018 2:11 PM
---Advertisement---

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शनिवारी (6आॅक्टोबर) तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताची फलंदाजी चांगलीच बहरली होती. तर गोलंदाजीही जबरदस्त झाली. त्यामुळे विंडिजच्या संघाला भारतीय संघाकडून काही गोष्टी शिकण्याचा फायदा होईल असे मत विंडिजचा प्रभारी कर्णधार क्रेग ब्रेथवेटने सांगितले आहे.

खेळताना सावध आणि त्याचबरोबर आक्रमकता यातील तोल राखता आला पाहिजे असे सांगताना ब्रेथवेट म्हणाला, “पुढे खेळताला आम्हाला आक्रमक फटके मारण्याबरोबरच बचावावरही विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मला वाटते हेच महत्त्वाचे आहे.”

“नक्कीच जेव्हा क्षेत्ररक्षक मागे असतात तेव्हा बचावात्मक खेळ करणे, वाईट चेंडूंना सोडून देणे आणि एक धाव काढण्यासाठी फटका खेळणे यात सकारात्मक दाखवणे गरजेचे आहे. मला असे वाटत नाही की आम्ही हवा तेवढा आमच्या बचावावर विश्वास ठेवला.”

याबरोबरच हा विंडिजचा खूप लाजिरवाणा पराभव असल्याचेही मत ब्रेथवेटने मांडले आहे.

ब्रेथवेटने या सामन्य़ातील शतकवीर पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीचेही कौतुक केले आहे. तसेच खेळी कशी उभारावी याचे त्यांनी उदाहरण दिले असल्याचेही त्याने म्हटले आहे.

तो म्हणाला, ‘नक्कीच शॉ हा आक्रमक होता. पण तो खेळताना 100 टक्के खेळात केंद्रीत होता. कोहलीही जेव्हा आला तेव्हा त्याने वेळ घेतला आणि मग खेळ केला.’

पुढे ब्रेथवेट म्हणाला, “मला वाटते त्यांच्याकडून आम्ही शिकू शकतो. ज्यामुळे आम्हाला मदत होईल. हे कसोटी क्रिकेट आहे त्यामुळे ही गोष्ट नक्कीच सोपी नाही. पण आम्हाला त्यांच्या पुस्तकातील पानांचा आभ्यास करुन त्याला आमच्या फलंदाजीत उतरवले पाहिजे. बचावावर पुर्ण विश्वास आणि आक्रमक खेळतानाही 100 टक्के त्यावर विश्वास हवा.”

पहिल्या कसोटीला विंडिजचा नियमित कर्णधार जेसन होल्डर दुखापत झाल्याने आणि वेगवान गोलंदाज केमार रोच आजीच्या निधनामुळे मायदेशी परतल्याने मुकले होता.

पण आता 12 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी केमार रोच उपलब्ध असेल अशी माहिती ब्रेथवेटने दिली आहे. त्याचबरोबर होल्डरच्या उपलब्धेवर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

महत्वाच्या बातम्या-

…आणि कुलदीप यादव बनला समालोचक; केले स्वत:च्या गोलंदाजीचे समालोचन

प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना रंगणार या दोन संघात

महाराष्ट्र डर्बी: पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बामध्ये रंगणार प्रो-कबड्डीचा दुसरा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment