भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा दुसरा सामना रविवारी(8 डिसेंबर) होणार आहे. हा सामना ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.
या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडीजच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.
भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या टी20 सामन्यात होऊ शकतात हे विक्रम –
-या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडिज विरुद्ध सलग 8 वा टी20 विजय मिळवण्यावर भारतीय संघाची नजर असेल. नोव्हेंबर 2018 पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सात टी20 सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत.
– रोहित शर्माने आज 1 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण करेल. 400 षटकारांचा टप्पा पार करणारा तो ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी नंतरचा जगातील केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरेल.
– या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने जर 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा वेस्ट इंडीजचा चौथा क्रिकेटपटू ठरेल.
-या सामन्यात जर विराट कोहलीने 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो भारतात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावा पूर्ण करेल. तसेच हा टप्पा पार करणारा पहिलाच भारतीय ठरेल. त्याचबरोबर मायदेशात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरोनंतरचा केवळ तिसरा फलंदाज ठरेल.
– वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्सने या सामन्यात 84 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावा पूर्ण करेल.
– युजवेंद्र चहलने सध्या 35 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे जर त्याने आज 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आर अश्विन(52 विकेट्स) आणि जसप्रीत बुमराहला(51 विकेट्स) मागे टाकत भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.
– दीपक चाहरने जर 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तो ट्वेंटी20मध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याने यावर्षी 53 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी20मध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तो बुमराह पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहने 2016मध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.
साउथ एशियन गेम्स: भारताचे सुवर्णपदकांचे शतक पूर्ण!
वाचा- ????https://t.co/yE8TikafmR????#म #मराठी @Mazi_Marathi @MarathiRT #SouthAsianGames
— Maha Sports (@Maha_Sports) December 8, 2019
मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हवेत चेंडू मारत नाही- विराट कोहली
वाचा- ????https://t.co/NG84xSa7Bm????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019