हैद्राबाद| विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पृथ्वी शाॅने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याची फलंदाजी पाहून कोणीही म्हणू शकणार नाही त्याचा हा पदार्पणाचा सामना होता. विंडिजच्या गोलंदाजांचा सामना त्याने अतिशय सहजतेने केला होता.
परंतु आता याच पृथ्वी शाॅला बाद करण्याचे तंत्र विंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोस्टन चेसला सापडले आहे.
”मागच्या सामन्यातील चुकांमधून आमच्या संघातील खेळाडू खूप काही शिकले आहेत. आम्हाला पृथ्वीच्या ताकदीची कल्पना आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याकडे आम्ही खूप सकारात्मकतेने पाहत आहोत.” असे चेसने सांगितले.
शाॅला बाद करण्याची योजना विंडिजच्या संघाने आखली असली तरी ते आताच ती उघड करू इच्छित नाहीत.
केमर रोच आणि जेसन होल्डर हे अनुभवी खेळाडू संघात परतल्याने संघाचा आत्मविश्वास वाढणार आहे.
”आमच्या फलंदाजांनी फटके मारताना थोडा संयम बाळगायला हवा होता. आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात आमचे खेळाडू बाद झाले. आम्ही आखलेल्या योजना मैदानावर प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत.” असे फलंदाजीला दोष देताना चेस म्हणाला.
भारताविरूद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना उद्यापासून (12 आॅक्टोबर) हैद्राबाद येथे सुरू होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
- प्रो कबड्डी: चढाईत ५०० गुण पूर्ण करणारा काशीलिंग अडके पाचवा खेळाडू, तर महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू
- वन-डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या मोठ्या खेळाडूला वगळले
- प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा अजय ठाकूर ठरला तिसराच खेळाडू