Loading...

प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा अजय ठाकूर ठरला तिसराच खेळाडू

-अनिल भोईर

चेन्नई | काल प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा चौथ्या दिवशी दुसरा सामना तमिल थलाईवाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स यांच्यात झाला. यासामन्या दरम्यान कर्णधार अजय ठाकूरने एक खास विक्रम केला.

तमिल थलाईवाजचा कर्णधार अजय ठाकूरला खास विक्रम करण्यासाठी १७ गुणाची आवश्यकता होती. आणि काल झालेल्या बेंगळुरू बुल्स विरुद्धच्या सामन्यात चढाईत १९ गुण मिळवत अजय ठाकूरने प्रो कबड्डी इतिहासात ६०० गुण पूर्ण केले. ६०० गुण पूर्ण करणारा अजय ठाकूर तिसरा खेळाडू ठरला.

बेंगळुरू बुल्स विरुद्ध त्याने कालच्या सामन्यात एकूण २० गुण मिळवले. कालच्या सामन्याआधी अजय ठाकुरचे एकूण ५८३ गुण होते. कालच्या सामन्यात १७ गुण मिळवताच अजयने प्रो कबड्डीच्या इतिहासात ६०० गुण मिळवण्याचा पराक्रम केला.

आतापर्यत त्याचे ८४ सामन्यात चढाईत ५८२ तर पकडीत २१ गुणसह एकूण ६०३ गुण झाले आहेत. तसेच प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ६०३ गुणांसह ३ ऱ्या स्थानावर आहे.

अजय ठाकूरने सिजन ६ मध्ये आक्रमक सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याने ४ सामन्यात ३ सुपरटेन सह ५४ गुण मिळवत पहिल्या क्रमांकवर आहे. पण ४ पैकी केवळ १ सामना तामिळ थालाईवस जिंकली आहे. अजय ठाकुरला संघातील इतर खेळाडूंचा पाहिजे तसं सहकार्य मिळत नसल्याने तामिळ थालाईवसला ३ पराभवांना समोरे जावे लागले.

प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू:
१) राहुल चौधरी – ८० सामने, ७१९ गुण
२) प्रदीप नरवाल – ६५ सामने, ६४३ गुण
३) अजय ठाकूर – ८४ सामने, ६०३ गुण
४) दीपक हुडा – ८२ सामने, ५७९ गुण
५) अनुप कुमार – ७९ सामने, ५५० गुण

Loading...

महत्वाच्या बातम्या-

You might also like
Loading...