भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावल्या आहेत. आता भारत वेस्ट इंडीजसोबत ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडीज आणि भारत संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या आठवड्यात या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या मालिकेत कोण गोलंदाजी करताना दिसणार आणि कोण फलंदाजी करताना दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न गेलेला भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध संघात परतण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्मा सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असला तरी, तो गेल्या काही दिवसांपासून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी लढत होता. आता तो पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिलीच मालिका खेळण्यास सज्ज आहे.
दरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार भारतीय महान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ही विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघातून काढले जाऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भुवनेश्वरला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याच्या चेंडूत स्विंगही दिसला नाही.
महत्वाची बाब ही आहे की, रविंद्र जडेजा कदाचित वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत दिसणार नाही. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची शक्यताही कमी आहे. हे दोन्ही खेळाडू अजुनही १०० टक्के तंदुरुस्त झाले नाही.
अधिक वाचा – मोठी बातमीः ‘रोहितसेने’साठी विश्वचषकाचा पहिला टप्पा आहे सोप्पा, भारताच्या ‘अ’ गटात आहेत हे संघ
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडीज मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता टी२० विश्वचषक २०२२ आणि आयपीएलजवळ येत असल्याने पुढीचे काही महिने खेळाडूंसाठी महत्वाचे असणार आहेत. बुमराहने दक्षिण आफ्रिका मालिकेत सर्वाधिक षटके टाकली आहेत, त्यामुळे त्याला विश्रांती देणे आवश्यक आहे.
व्हिडिओ पाहा – रोहित शर्माला टीम इंडियाचा वनडे कर्णधार करण्याचा निर्णय ‘या’ ४ कारणांमुळे चुकीचा
याशिवाय कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेला वॉशिंग्टन सुंदरही भारतीय संघात परतणार असल्याचे म्हणले जात आहे. तसेच अक्षर पटेलसुद्धा आता तंदुरुस्त झाला आहे, त्यामुळे त्यालाही संघात संधी मिळू शकते.
अहमदाबादमध्ये पार पडणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ६ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारीला आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर १६ फेब्रुवारीपासून या दोन संघात टी२० मालिका सुरू होईल आणि सर्व सामने कोलकातामध्ये खेळवले जातील. टी२० मालिकेतील दुसरा सामना १८ फेब्रुवारीला आणि तिसरा सामना २० फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर