---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज| वनडे-टी२० मालिकेचा रंगाणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि दोन्ही संघाचे खेळाडू

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 5:57 PM
india-in-south-africa
---Advertisement---

कायरन पोलार्डच्या नेतृत्त्वातील वेस्ट इंडिज संघ फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील सामन्यांना ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्मा सांभाळणार आहे. या दरम्यान रोहित पहिल्यांदाच भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाच्या नियमित कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. 

वनडे मालिका (ODI Series) ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे पार पडणार आहे. तर, १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान टी२० मालिका (T20I Series) इडन गार्डन्स, कोलकाता येथे पार पडणार आहे. वनडे मालिकेतील तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होतील, तसेच टी२० सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत.

वनडे आणि टी२० या दोन्ही मालिकांसाठी भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील खेळाडूंची घोषणा झाली आहे. भारताने या मालिकांसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी विश्रांती दिली आहे. तसेच या मालिकांदरम्यान रवी बिश्नोई आणि अवेश खानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

तसेच विशेष गोष्ट अशी की, विराट कोहली या मालिकांदरम्यान पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल. यापूर्वी तो कधीही रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळलेला नाही. (West Indies Tour of India)

आमने सामने कामगिरी
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात आत्तापर्यंत १३३ वनडे सामने खेळले आहेत. यातील ६४ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच वेस्ट इंडिजने ६३ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

विशेष गोष्ट अशी की, भारत आणि वेस्ट इंडिज संघात ६ फेब्रुवारी रोजी होणारा वनडे सामना हा भारताचा १००० वा वनडे सामना असणार आहे.

असे आहेत वनडे मालिकेसाठी संघ 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्ट इंडिज – कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हौसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनिअर

असे आहेत टी२० मालिकेसाठी संघ 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

वेस्ट इंडिज – कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रावो, रोस्टेन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, कायल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनिअर

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे असे आहे वेळापत्रक 
वनडे मालिका 
६ फेब्रुवारी – पहिला वनडे – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
९ फेब्रुवारी – दुसरा वनडे – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
११ फेब्रुवारी – तिसरा वनडे – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

टी२० मालिका
१६ फेब्रुवारी – पहिली टी२० – इडन गार्डन्स, कोलकाता
१८ फेब्रुवारी – दुसरी टी२० – इडन गार्डन्स, कोलकाता
२० फेब्रुवारी – तिसरी टी२० – इडन गार्डन्स, कोलकाता

महत्त्वाच्या बातम्या – 

VIDEO: लखनऊ सुपरजायंट्सच्या नव्याकोऱ्या लोगोचे झाले अनावरण; तिरंगा आणि क्रिकेटचा साधला मेळ

प्रेम हे…!! पावसामुळे सामना थांबला असताना मिस्टर अँड मिसेस स्टार्कचा दिसला रोमँटिक अंदाज, पाहा व्हिडिओ

वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित नेतृत्त्व तर करणारच, पण सचिनचा ‘हा’ विक्रमही मोडण्याची असेल संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---