भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहूल मर्यादित षटकांच्या सामन्यात दमदार कामगिरी करत आहे. कसोटी सामन्यात मात्र राहूलला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
इंग्लड विरूद्धच्या कसोटी मालिकेत राहूलने संमिश्र कामगिरी करत 29 च्या सरासरीने पाच सामन्यात 299 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडिजविरूद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात राहुल शुन्यावर बाद झाला होता.
केएल राहुल हा 2018 या वर्षात 3 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. तो 6 वेळा दोन आकडी धावसंख्याही गाठू शकला. मागील 16 डावात राहूलला फक्त 8 वेळा 10पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला. राहुल शिवाय वरच्या फळीतील फलंदाजापैकी केवळ दक्षिण अफ्रिकेच्या डिन एल्गारने मागील 18 डावात 8 वेळा 10 पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
भारताने विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 272 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावत 649 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युतर देताना विंडिजचे दोन्ही डाव अनुक्रमे 184 आणि 196 धावांवर आटोपला होता. या सामन्यातील पहिल्या डावात तर राहुलाला भोपळाही फोडता आला नाही.
भारत आणि विंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना 12 आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यात राहुलकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- अफगाणिस्तानविरुद्ध वन-डेतील कॅप्टन्सी धोनीला पडली महागात
- हैद्राबादमध्ये कोहली मोडणार पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकचा विक्रम
- पृथ्वी शाॅ बद्दल केलेले ट्विट स्विग्गी आणि फ्रिचार्ज यांना पडले १ कोटीला