---Advertisement---

वनडे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग, धवनच्या पुनरागमनाचीही शक्यता

Team India
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. तिसऱ्या सामन्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवन (shikhar dhawan) संघात पुनरागमन करण्याची पूर्ण शक्यता आहे आणि संघाचा प्रयत्न ही मालिका क्लीन स्वीप करण्याचा असेल. एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी धवन आणि संघातील इतर तीन खेळाडू कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते. अशात धवनने संघात पुनरागमन केल्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात.

कर्णधार रोहित शर्मानेही धनवच्या पुनरागमनाविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत. दुसऱ्या सामन्यात भारताने ४४ धावांनी विजय मिळवल्यानंतर धवन शेवटच्या सामन्यात खेळणार असल्याचे रोहितने सांगितले होते. रोहित म्हणाला होता की, “शिखर पुढचा सामना खेळेल. गोष्ट प्रत्येक वेळी परिणामांची नसते, त्याला मैदानावर वेळ घालवण्याची गरज आहे.”

धवनच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात ईशान किशनने डावाची सुरुवात केली होती, तर दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतने सलामीवीराची भूमिका पार पाडली. तिसऱ्या सामन्यासाठी जर धवनला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले, तर उपकर्णधार केएल राहुलवर पुन्हा एकदा मध्यक्रमात फलंदाजी करण्याची वेळ येऊ शकते. रोहित दुसऱ्या सामन्यात स्वस्तात बाद झाला असला, तरी धवन आणि तो पुढच्या सामन्यात गोलंदाजांची चांगलीच धुलाई करू शकतात. पंत आणि सूर्यकुमार यादव मध्यक्रमात फलंदाजी करतील. धवनसाठी अष्टपैलू दीपक हुड्डा जागा मोकळी करू शकतो.

सूर्यकुमार यादवने मागच्या सामन्यात ६४ धावा केल्या होत्या, त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी त्याने स्वतःचे स्थान भक्कम केले आहे.  फिरकी गोलंदाज कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची वाट पाहत आहे. तसेच रवी बिश्नोईलाही संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल आणि वाशिंगटन सुंदर यांपैकी कोणा एकाला बाहेर बसवले जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज आवेश खानही संधीची वाट पाहत आहे. आवेश खानला संधी दिल्यावर मोहम्मद सिराजला बाहेर बसवले जाऊ शकते. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारताने मालिका जिंकली आहे. अशात शेवटच्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

फॉर्मातील बंगलोर ‘टॉप’च्या हैदराबादला गाठण्यास उत्सुक

आयपीएल लिलावात प्रसिद्ध होणार ‘कृष्णा’! ‘या’ चार संघांची असणार करडी नजर

‘निर्णय माझे आणि क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतले’; कायमचा संघाबाहेर होण्याच्या वाटेवर असलेला रहाणे संतापला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---