मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यासह टीम इंडियाचा इंग्लंड दौराही संपला आहे. ब्लू आर्मीने इंग्लंड दौऱ्यावर टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही ताब्यात घेतली. गेल्या सामन्यात २४ वर्षीय युवा यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंतने देशासाठी समस्यानिवारणाची भूमिका बजावली होती. खरे तर, तिसऱ्या वन-डे सामन्यात, एके काळी, भारतीय संघ 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या चार प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स गमावून ७२ धावांवर झुंजत होता. मात्र येथून मैदानात आलेल्या पंतने प्रथम पंड्यासोबत शतकी भागीदारी केली. यानंतर त्याने जडेजासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यादरम्यान त्याने ११३ चेंडूत १२५ धावांचे स्फोटक शतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १६ चौकार आणि दोन उत्कृष्ट षटकार आले. या सुरेख खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.
इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना वेस्ट इंडिज क्रिकेट संघाशी आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. वनडे मालिकेतील पहिला सामना २२ जुलै, दुसरा २४ जुलै आणि शेवटचा सामना २७ जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवले जातील.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे वेळापत्रक:
२२ जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन, संध्याकाळी ७ पासून
२४ जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन, संध्याकाळी ७ पासून
२७ जुलै, पोर्ट-ऑफ-स्पेन, संध्याकाळी ७ पासून
एकदिवसीय मालिका संपल्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. टी-२० मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १ आणि २ ऑगस्ट रोजी बॅसेटेरे येथील वॉर्नर पार्क येथे आणि चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी लॉड्रीहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर खेळवला जाईल. हे सर्व सामने रात्री ८ वाजता सुरू होतील.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिकेचे वेळापत्रक:
२९ जुलै, तरौबा, रात्री ८ वा
१ ऑगस्ट, बससेटेरे, रात्री ८ वा
२ ऑगस्ट, बससेटेरे, रात्री ८ वा
६ ऑगस्ट, लाउडरहिल, रात्री ८ वा.
९ ऑगस्ट, लाउडरहिल, रात्री ८वा.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रशांत कृष्णा , मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे
निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उप-कर्णधार), शामराह ब्रूक्स, केसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मागच्या आठ वर्षात इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा भारत दुसरा संघ, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड्स
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ
रिषभ पंत अन् इंग्लंडचा अंत! वनडेतील पहिलेच शतक झळकावत परदेशी भुमीवर केलीये ‘ही’ रेकॉर्डब्रेक कामगिरी





