मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरू असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या मोबदल्यात 377 धावा केल्या आहेत.
यावेळी भारताने वनडेमध्ये 375 किंवा त्यापेक्षा अधिक धावा 13 वेळा करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच असा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने नऊ वेळा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाने प्रत्येकी पाच वेळा केला आहे.
विंडीज विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने उत्कृष्ठ सुरूवात केली. यावेळी सलामीवीर रोहित शर्माने 137 चेंडूत 162 धावांची तुफानी खेळी केली. त्याला अंबाती रायडूने चांगली साथ दिली. यावेळी रायडूनेही त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक साजरे केले.
फलंदाजीला आलेल्या विंडीज संघाची सुरूवात अडखळतच झाली आहे. 15 षटकात 6 मोबदल्यात त्यांनी 59 धावा केल्या आहेत. त्यांचे स्टार फलंदाज शाय होप आणि शिमरॉन हेडमेयर हे लवकरच बाद झाले.
पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.
वनडेमध्ये 375 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे संघ –
13 – भारत
9 – दक्षिण आफ्रिका
5 – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम
–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग
–श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अटक