---Advertisement---

या कारणामुळे विंडिज संघाने खांद्याला बांधली काळी पट्टी!

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 4:10 PM
---Advertisement---

राजकोट। आजपासून सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध विंडिज संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात विंडिज संघ हाताला काळी पट्टी बांधून खेळत आहे.

विंडिज संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज केमार रोचच्या आजीचे निधन झाल्याने पुन्हा मायदेशी परतला आहे. त्यामुळे त्यांनी केमार रोचच्या प्रती आदर म्हणून ही काळी पट्टी हाताला बांधली आहे. याबद्दल विंडिज क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर माहिती दिली आहे.

रोच या दुख:द घटनेनंतर पहिल्या सामन्याच्या आधी भारतात येणार होता. पण विंडिज संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी माहिती दिली की तो सध्या या दुखद प्रसंगी त्याच्या कुटुंबासमवेत असून पहिला सामना सुरु असताना संघात सामील होईल. त्यामुळे तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे.

केमार रोचने कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 28.31 च्या सरासरीने 163 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गॅब्रियल, किमो पॉल आणि शर्मन लेविसवर असणार आहे.

रोचबरोबरच पहिल्या सामन्याआधी विंडिज संघाला त्यांचा नियमित कर्णधार जेसन होल्डरही दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात त्याच्या ऐवजी विंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेट करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment