झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. त्याला विश्रांती देण्याची चर्चा होती. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. मात्र संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहते खूश नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच या सामन्यादरम्यान सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पडला.
चहरने मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत २७ धावांत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तब्बल ६ महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी आला होता. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२२मध्ये खेळू शकला नाही. यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी चांगली झाली नाही. संघाने त्याला १४ कोटी रुपयांना खरेदी केले.
एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, देख रहा है दीपक कैसे तुझे आऊट ऑफ फ्रेम किया जा रहा है’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘दीपक चहर आजचा सामना का खेळत नाही. आशिया कपसाठी त्याला राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.’ दुसर्याने लिहिले की, ‘दीपक चहरला दुखापत न होता आराम कसा मिळेल. त्यांना आशिया चषकापूर्वी सराव सामन्याची गरज आहे.’
बुमराहही जखमी झाला आहे
टीम इंडियाचे गोलंदाज सध्या दुखापतग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-२० आशिया कपमधून बाहेर पडला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-२० विश्वचषकातही तो खेळण्याबाबत साशंकता आहे. याशिवाय हर्षल पटेलही दुखापतीमुळे बाहेर होत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात दीपक चहरची तयारी उघड होईल. आशिया कपसाठी स्टँडबाय म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे केएल राहुलही झिम्बाब्वे मालिकेतून दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. शिवाय दुसऱ्या सामन्यात संधी मिळूनही तो खआस कामगिरी करण्यात अपयशई ठरल्याचे दिसून आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या जामदारची अल्टिमेट खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी
VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया
जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर! फलंदाजांना मिळणार मोकळे रान