आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी टीम इंडिया हरारेला पोहोचली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 जुलैपासून येथे टी20 मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी बहुतांश युवा खेळाडूंची निवड केली आहे. त्यात अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांचाही समावेश आहे. या मालिकेसीठी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच रियान आणि अभिषेकची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रियान म्हणाला, “आम्ही सामने खेळतो, पण (टीम इंडियासोबत) असा प्रवास करणे हे एक स्वप्न होते. क्रिकेटशी संबंधित गोष्टी, संघासोबत प्रवास करणे आणि टीम इंडियाचे कपडे घालणे. हे सर्व बालपणीचे स्वप्न होते. टीम इंडियासाठी खेळणे हे लहानपणापासूनचे स्पन्न आहे. झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असणार आहे.
अभिषेक शर्मा म्हणाला, “मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून टीम इंडियासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. जिथून माझा पहिला कॉल येईल, “हे खूप खास असेल.” कारण तिथूनच माझा व्यावसायिक प्रवास सुरू होईल. मी मेहनत करत राहिलो तर मला संधी मिळेल हे मला माहीत होते. टीममध्ये माझं नाव येताच मला पहिला फोन शुभमनचा आला होता.
पुढे तुषार देशपांडे म्हणाला, “भारतासाठी खेळणे हा आयुष्यतील सर्वात मोठा क्षण आहे. भारतासाठी सामना खेळणे हे माझे पहिले स्पन्न होते ते आता साकार होणार आहे. भारतीय संघसोबत प्रवास करणे सर्व खेळाडूंसोबत जुळवून घेणे हे सर्व आनंददायी आहे”.
Travel Day ✅
The Journey Begins… 👌
Excitement, happiness & more, ft. #TeamIndia newcomers 😎#ZIMvIND | @ParagRiyan | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/YdhK5jldtW
— BCCI (@BCCI) July 3, 2024
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 7 जुलै रोजी होणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैला आणि चौथा सामना 13 जुलैला होणार आहे. अशा प्रकारे शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
“मरणाच्या दारापासून ते टी20 विश्वचषक विजेता”, पाहा रिषभ पंतचा प्रेरणादायी प्रवास
‘टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत’ झिम्बाब्वे क्रिकेटने केले टीम इंडियाचे खास पद्धतीने कौतुक
द्रविडची निवृत्ती, गंभीरबाबत अपडेट नाही; मग झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक कोण?