भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वे संघाची दाणादाण उडाली. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने झिम्बाब्वेच्या संघाला १६१ धावात गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. झिम्बाब्वेचा संघ ३८.१ षटकातच सर्वबाद झाला आणि भारताला १६२ धावांचे आव्हान मिळाले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निवडत भारतीय संघाने झिम्बाब्वेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पुन्हा एकदा भारताच्या गोलंदाजांनी कर्णधार केएल राहुलचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरवला.
भारतीय फलंदाजांपुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरश लोटांगण घातले. झिम्बाब्वेचे सलामीवीर २० धावांच्या आतच बाद झाले. तकुझ्वानशे कायतानो ७ धावांवर बाद झाला. तर इनोसेंट काइयानेही १६ धावांवर विकेट गमावली. त्यानंतर वेस्ले माधवेरे (२ धावा) आणि कर्णधार रेगिस चकाब्वा (२ धावा) यांनाही विशेष योगदान देता आले नाही. विस्फोटक फलंदाज सिकंदर रझाही १६ धावांवरच पव्हेलियनला परतला.
सिन विलियम्सने पुढे मोर्चा सांभाळला. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने ४२ धावांची चिवज झुंज दिली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले. परंतु त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्याचबरोबर खालच्या फळीत रयान बर्ल याने नाबाद ३९ धावांची छोटेखानी खेळी केली. खालच्या फळीतील इतर फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले.
Zimbabwe are all out for 161!
Watch #ZIMvIND LIVE on https://t.co/CPDKNxpgZ3 with an ODI Series Pass (in select regions) 📺 | Scorecard: https://t.co/bIA0RD2F5T pic.twitter.com/ueaU34aXq3
— ICC (@ICC) August 20, 2022
या डावात भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. दीपक चाहरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करण्यात आलेल्या शार्दुलने ७ षटके फेकताना ३८ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. तसेच मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक हुड्डा यांनाही एक-एक विकेट मिळाली.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्षणात तोडलं हृदय! इंग्लंडचा शतकवीर दुर्देवीरित्या धावबाद, संघ सहकाऱ्यानेच उडवल्या दांड्या
सोलापूर ते नागालँड अन् थेट टीम इंडिया असा प्रवास करणाऱ्या किरणची रोमहर्षक कहाणी, एकदा वाचाच
संजूच्या यष्टीरणाची बात काही औरच! चित्यासारखी चपळता दाखवत एका हाताने घेतला झेल