---Advertisement---

झिम्बाब्वेविरुद्ध 8 वर्षांपासून हरलेला नाही भारत, टी20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड!

On: बुधवार, जुलै 3, 2024 6:02 PM
---Advertisement---

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 टी20 सामन्यांची मालिका 6 जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया तब्बल 8 वर्षांनंतर झिम्बाब्वेमध्ये टी20 मालिका खेळणार आहे.

वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत, या दौऱ्यासाठी युवा शुबमन गिलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ हरारे येथे पोहोचला आहे. या दौऱ्यासाठी टी20 विश्वचषक खेळलेल्या 3 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र, हे तिघे पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाहीत. टी20 विश्वचषकातील यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन हे पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही. त्यांच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड करण्यात आली आहे.

टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. मात्र अद्याप नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचं प्रशिक्षकपद भूषवणार आहेत. ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख आहेत.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, उभय संघांमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले. यापैकी भारतानं 6 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला दोन सामन्यांत विजय मिळाला आहे.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी20 – शनिवार, 6 जुलै
दुसरा टी20 – रविवार, 7 जुलै
तिसरा टी20 – बुधवार, 10 जुलै
चौथा टी20 – शनिवार, 13 जुलै
पाचवा टी20 – रविवार, 14 जुलै

टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत – शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी – साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा

झिम्बाब्वे – सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट कैया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधवेरे, तदिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुता, आशीर्वाद मुझाराबानी, आशिर्वाद मुझाराबानी, डी. रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईमध्ये कधी होणार टीम इंडियाची विजयी परेड; समोर आलं संपूर्ण वेळापत्रक
कमबॅक असावा तर असा! हार्दिक पांड्याचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
जय शाह यांचं मोठं मन! बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांसाठी केला मदतीचा हात पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---