---Advertisement---

तब्बल १९ वर्ष जुना इतिहास बदलण्याची ‘टीम इंडिया’ला संधी; गांगुलीनंतर विराट बनू शकतो ‘असा’ कर्णधार

virat-kohli-captain
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर उभय संघ विजयाचा प्रयत्न करतील. त्याच वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तब्बल १९ वर्ष जुना एक विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल.

न्यूझीलंडची नेहमी सरशी
विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आकडेवारी पाहिल्यास न्यूझीलंड संघ नेहमीच भारतीय संघावर वरचढ ठरला. भारतीय संघाने न्यूझीलंडवर विश्वचषकातील आपला अखेरचा विजय २००३ विश्वचषकात मिळवलेला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या वनडे विश्वचषकातील सामन्यात सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडवर सात गड्यांनी विजय नोंदवला होता. न्यूझीलंडने उभारलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केवळ तीन गडी गमावलेले.

यानंतर २०१९ वनडे विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले. साखळी फेरीतील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा १९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. २००७ टी२० विश्वचषकात साखळी फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १० धावांनी तसेच २०१६ टी२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात ४७ धावांनी भारतावर मोठा विजय मिळवलेला. त्यामुळे १९ वर्षापासून विश्वचषक विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय संघाकडे हा सामना जिंकून इतिहास रचण्याची मोठी संधी असेल.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व वरूण चक्रवर्ती.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संभाव्य संघ-
टीम सिफर्ट, मार्टिन गप्टिल, केन विलियम्सन (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, डेवॉन कॉनवे, जिमी निशाम, मिचेल सॅंटनर, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने व ईश सोढी.

महत्त्वाच्या बातम्या-

बटलर-बेअरस्टो जोडीने षटकारांची वर्षा करत झम्पाची उडवली दाणादाण, बघून मॉर्गनलाही आली दया

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, पाहा काही खास क्षणचित्रे

देनेवाला जब भी देता..! मुंबई इंडियन्सने साथ सोडल्यानंतर हार्दिकची लागणार लॉटरी, बनेल ‘या’ संघाचा कॅप्टन?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---