कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहास प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस (१८ जून) नाणेफेकही न होता वाया गेला. सततचा पाऊस व त्यामुळे खराब झालेले मैदान यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला. भारतीय संघाने सामन्याचा एक दिवस आधीच संघनिवड जाहीर केली होती. मात्र, भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आता याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गावसकरांचे महत्त्वपूर्ण विधान
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी एक दिवस आधीच संघाची घोषणा केली होती. या संघात यष्टीरक्षकासह ६ तज्ञ फलंदाजांना संधी दिली गेली असून, दोन फिरकीपटू व तीन वेगवान गोलंदाज अंतिम अकरामध्ये आहेत. परंतु, पहिला दिवस वाया गेल्यानंतर, पुढील चार दिवस देखील पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
एजबॅस्टनमधील एकूण परिस्थिती पाहता भारतीय संघ आपल्या संघात फेरबदल करू शकतो, असे भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. गावसकर म्हणाले, “भारतीय संघ सध्याची परिस्थिती पाहता संघात बदल करू शकतो. कारण, या वातावरणात आणि खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो. एका फिरकीपटूला बाहेर करून एका तज्ञ फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. नाणेफेक होईपर्यंत संघात बदल करण्याची मुभा असते.” भारतीय संघ जाहीर केला गेला असला तरी, न्यूझीलंडने ‘वेट & वॉच’ ची भूमिका घेत अखेरच्या क्षणी संघ घोषित करणार असल्याचे म्हटले आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या-
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ