यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं सुपर सामन्यात सलग 2 विजय मिळवून सेमीफायनलकडे आगेकूच केलं आहे. भारत ग्रुप-1 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. परंतु सेमीफायनलसाठी कोणते दोन संघ पात्र ठरतील हे अधिकृतपणे स्पष्ट झालं नाही. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया ग्रुप-1 मधील संघांसाठी सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्याची समीकरणं (Semi Final Equation) कशी आहेत?
ग्रुप 1 मध्ये, भारत गुण 4 नेट रनरेट (+2.425), ऑस्ट्रेलिया गुण 2 नेट रनरेट (+.0223), अफगाणिस्तान गुण 2 नेट रनरेट (-0.650) आणि बांग्लादेश गुण 2 नेट रनरेट (-2.289) आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सोमवारी (24 जून) रोजी खेळला जाणार आहे. डॅरेन सॅमी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल. परंतू या सामन्यात जर ऑस्ट्रेलियानं भारताचा 41 धावांनी पराभव केला. तर भारताचा सेमीफायनल मधून पत्ता कटू शकतो. कारण (25 जून) रोजी होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशला 81 धावांनी पराभूत केलं तर भारत यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडेल आणि अफगाणिस्तान 4 गुणांसह क्वालिफाय होईल.
परंतू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामन्यात जर भारतानं ऑस्ट्रेलियाचा 55 धावांनी धुव्वा उडवला आणि (25 जून) रोजी होणाऱ्या सामन्यात जर बांगलादेशनं अफगाणिस्तानला 31 धावांनी नमवले तर मात्र सेमीफायनलसाठी बांगलादेश त्यांचं तिकीट पक्कं करेल.
सोमवार (24 जून) रोजी होणाऱ्या सामन्यात जर भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला तर भारत 6 गुणांसह क्वालिफाय होईल आणि अफगाणिस्ताननं जर बांगलादेशचा पराभव केला तर अफगाणिस्तान 4 गुणांसह सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. परंतू, जर ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला, तर सेमीफायनलसाठी पात्र होण्यासाठी अफगाणिस्ताननं बांगलादेशला 36+ धावांनी पराभूत करणं आवश्यक आहे. तरच अफगाणिस्तान सेमीफायनलसाठी तिकीट पक्कं करेल.
ग्रुप 1 मधील उर्वरित सुपर 8 सामने सेमीफायनलच्या लढतीसाठी खूप रोमांचक आहेत. परंतू भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना झाल्यानंतर ग्रुप 1 च्या गुणतालिकेत मोठे उलटफेर पाहायला मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या सविस्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर नवीन उल हकची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट, कुणाकडे इशारा?
हरवलेला चेंडू शोधण्यासाठी विराट कोहलीची तारांबळ! व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लुटला आनंद