---Advertisement---

अफगाणिस्ताननं घेतला मागील पराभवाचा बदला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर

On: रविवार, जून 23, 2024 9:28 AM
---Advertisement---

2024 टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकांत 127 धावांवर ऑलआऊट झाला.

या विजयासह अफगाणिस्तानचे 2 सामन्यांत 2 गुण झाले आहेत. राशिद खानच्या संघाला सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध पराभ पत्कारावा लागला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर त्यांनी स्पर्धेत कमबॅक केला आहे. मिचेल मार्शच्या ऑस्ट्रेलियाचे देखील 2 सामन्यांत 2 गुण आहेत. ऑस्ट्रेलियानं सुपर 8 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता.

टी20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ साखळी फेरीतील 4 सामने आणि सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून येथे पोहोचला होता. परंतु अफगाणिस्तान संघानं ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला. हा सामना जिंकून अफगाणिस्ताननं उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा तर जिवंत ठेवल्या आहेत. यासह ग्रुप 1 मध्ये बांगलादेशचा संघही जिवंत आहे. आता ऑस्ट्रेलियासाठी सेमीफायनलचं समीकरण अवघड झालं आहे. भारताविरुद्धचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियन संघासाठी करो या मरो असेल.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 20 षटकात 6 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या. रहमानउल्ला गुरबाजनं 49 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. तर इब्राहिम झद्राननं 48 चेंडूत 51 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं हॅट्ट्रिक घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ऑस्ट्रेलियन संघ 127 धावा करून गडगडला. अफगाणिस्ताकडून गुलबदिन नायबनं 4 आणि नवीन उल हकनं 3 बळी घेतले.

अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला, या सामन्यातही तो तेच करेल असं दिसत होतं. या सामन्यात त्यानं 41 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावांची खेळी खेळली. एकेकाळी असं वाटत होतं की वर्ल्ड कप 2023 ची कहाणी पुन्हा लिहिली जाईल. परंतु गुलबदिन नायबनं हे होऊ दिलं नाही. त्यानं ग्लेन मॅक्सवेलला नूर अहमदकडे झेलबाद करून अफगाणिस्तानला सामन्यात परत आणलं. यानंतर त्यानं पॅट कमिन्सची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला सामन्याच्या बाहेर केलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता वर्ल्ड कप आपलाच! हे आहेत भारताच्या बांगलादेशवरील दणदणीत विजयाचे 5 नायक
पॅट कमिन्सची सलग दुसरी हॅट्ट्रिक! टी20 विश्वचषकात घडला नवा इतिहास
हार्दिक-कुलदीपच्या झंझावातात बांगलादेश उडाला! टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्कं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---