fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ऑस्ट्रेलियात होणारा ‘तो’ कसोटी सामना जिंकणे टीम इंडियासाठी केवळ अशक्य

मुंबई । क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक तयार केले आहे. या दौऱ्यात 3-टी-२०, ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे अकरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. भारताचा हा विदेशातला पहिला  दिवस रात्र कसोटी सामना असणार आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ११ ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. हा दौरा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन मध्ये रहावे लागणार आहे.

मागील वर्षी ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने विराट कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी आव्हान दिले होते. त्यानंतर भारत कोणत्याही मैदानावर दिवस रात्र कसोटी खेळण्यास तयार असल्याचे विराट कोहलीने सांगितले होते.

दिवस रात्र सामन्यात ऑस्ट्रेलियाला १०० टक्के यश

दिवस रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला आहे. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने ७ दिवस रात्र कसोटी सामने खेळले असून या सर्व सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात त्यांनी डावाने विजय मिळवला आहे. यातील सात पैकी चार दिवस रात्र कसोटी सामने हे ऍडलेडच्या मैदानावर झाले आहेत. भारताबरोबर ही त्यांचा सामना याच मैदानावर होणार असल्याने भारतासाठी हा सामना आव्हानात्मक ठरणार आहे.

दिवस रात्र कसोटी सामने खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाकडे भारतापेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका यांच्याविरुद्ध दिवस रात्र कसोटी सामना खेळला आहे.

दुसरीकडे भारताने आतापर्यंत एकमेव दिवस रात्र कसोटी सामना मागील वर्षी कोलकाता येथे ईडन गार्डनच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळला होता. यात भारताने बांगलादेशवर धावांनी विजय मिळवला होता.

You might also like