यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या या फाॅरमॅटमध्ये कर्णधारपदात मोठा बदल पाहायला मिळाला. या बदलानंतर शुबमन गिल हा भारताचा पुढचा कर्णधार होणार असल्याची चर्चा होत आहे. रोहित शर्माने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतली, त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे टी20 संघाची कमान सोपवण्यात आली. यासह शुबमन गिलची श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
गिलला उपकर्णधार बनवल्यानंतर आता रोहित शर्मानंतर गिलच टीम इंडियाचा पुढचा कर्णधार असेल, अशी चर्चा जोरदार सुरु आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही गिलच्या कर्णधारपदाबद्दल बोलला आहे.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना आर श्रीधर म्हणाले, “माझ्यासाठी शुबमन हा सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे आणि मला वाटते की तो एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माचा प्रशिक्षणार्थी असेल. मला खात्री आहे की भारत त्याला सर्व फॉरमॅटमध्ये संधी देईल. 2027 एकदिवसीय विश्वचषकाचा कर्णधार म्हणून पाहिले जाईल.
2024 च्या टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वेला भेट दिली होती. या दौऱ्यावर शुबमन गिलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. गिलने टीम इंडियाची कमान घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
शुबमन गिल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसला होता. गिलच्या आधी हार्दिक पांड्या गुजरातचे नेतृत्व करत होता, पण हार्दिकने गुजरात सोडले आणि 2024 च्या आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. हार्दिकच्या जाण्यानंतर शुबमन गिलला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते.
गिलच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 25 कसोटी 46 वनडे तर 21 टी20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये कसोटी सामन्यात त्याने 1492 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 6 अर्धशतके ठोकल्या, वनडे सामन्यात 6 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2322 धावा केल्या आहेत. टी20 सामन्यात त्याने 578 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
T20 World Cup: सत्तापालटानंतर बांग्लादेशवर टांगती तलवार, टी20 विश्वचषकाचे यजमानपद धोक्यात
दिनेश कार्तिकचा यू-टर्न, लवकरच खेळणार टी20 मालिका, या संघात लागली वर्णी!
मैदानाऐवजी भारतीय खेळाडू माॅलमध्ये व्यस्त; श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची शाॅपिंग