पुणे । विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र यावेळी पराभवाचा सामना करावा लागला.
कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
भारत विरुद्ध तुर्कस्थान यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या लढतीत मुन्ना झुंझुरकेने ईयुप ओरमानला पराभूत केले. लढतीतील केवळ तिसऱ्याच मिनिटाला मुन्नाने ‘लाटणे’ डाव टाकताना ओरमानवर चीतपट करताना विजय साकारला.
अटीतटीच्या झालेल्या लढतीत माऊली जमदाडेने गुऱ्हकन बल्कीला पराभूत केले. माऊली आक्रमक चढायाने बल्की यांने मैदानाबाहेर झेप घेतली. त्यानंतर काही क्षणातच माऊलीने ‘घिसा’ डावावर बल्कीला चीतपट करत विजय पटकावला.
उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व मेटीन टेमिझी यांच्या लढतीत किरण भगतने ‘एकचाक’ डावात मुसंडी मारत मेटीन तेझमीला आसमान दाखवले. हिंदकेसरी साबा कोहलीला इस्माईल इरकल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंना गुण मिळविण्यात अपयश आले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रथम गुण मिळविणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. तुर्कस्थानच्या इस्माईल इरकलने गुण मिळवत ही लढत जिंकली.
चुरशीच्या झालेल्या लढतीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने अहमत सिलबिस्टला पराभूत केले. सहाव्या मिनिटाला विजय चौधरी याने ‘घुटना’ डाव टाकत अहमत सिलबिस्टला चीतपट करताना लढत जिंकली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. पालकमंत्री गिरीष बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर मुक्ता टिळक, आयोजक व माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पुणे मनापा आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, मनापाचे क्रीडा उपायुक्त तुषार दौंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र भामरे (सह.पोलीस आयुक्त), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगरचे कार्यवाह बापुजी घाटपांडे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, राजेंद्र येनपुरे, सुशील मेंगडे, राजेंद्र खेडेकर, मंजुषा खेडेकर, छायाताई मारणे, दीपक पोटे, हेमंत रासने, उमेश गायकवाड, अमोल बालवडकर, किरण दगडे, शिवराम मेंगडे, राजाभाऊ बराटे, वासंती जाधव, आबा बागुल, सचिन दोडके, रघुनाथ गवडा, सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर,प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर तसेच कुस्ती क्षेत्रातील हिंदकेसरी दीनानाथ सिंहा, ऑलिम्पिकवीर काका पवार, मारुती आडकर, हिंदकेसरी योगेश दोडके, अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, अमोल बुचडे, अभिजित कटके, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते विलास कथुरे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव किसनराव बुचडे महराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सदस्य मेघराज कटके, गणेश दांगट, आशियाई पदक विजेते राम सारंग, उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील, संतोष गरुड, राष्ट्रपती पदक विजेते कैलास मोहळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, शिवाजी बुचडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात नवनाथ जाधव, दिनेश माथवड, निलेश कोंढाळकर, गणेश वरपे, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, संतोष मोहोळ, ज्ञानेश्वर मोहोळ, दुष्यंत मोहोळ, विलास मोहोळ यांनी विशेष मेहनत घेतली.