यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात भारतानं दमदार कामगिरी केली. भारतान फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि यंदाच्या टी20 विश्वचषकावर नाव कोरले. भारतानं बार्बाडोसच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला परंतू भारताच्या 2 दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
भारतानं 13 वर्षांनंतर यंदाच्या आयसीसी ट्राॅफीवर नाव कोरले परंतू भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्तीची घोषणा केली. आनंदाच्या क्षणी भारतीय चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सामना झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती परंतू या दिग्गज अष्टपैलू खेळाडूनं देखील त्यांच्या पाठोपाठ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले.
रवींद्र जडेजानं त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 74 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 21.45च्या सरासरीनं 515 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक 127.16 राहिला. तर गोलंदाजी करताना त्यानं 74 सामन्यांमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजा हा दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जडेजानं भारताला अनेक कठीण परिस्थितीत सामने जिंकून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माच्या जागी…”, भारतानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची प्रतिक्रिया
3 खेळाडू जे भारताच्या टी20 संघात विराट कोहलीची जागा घेऊ शकतात
“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया