सेंच्युरीयन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडणाऱ्या सहाव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने आधीच ४-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे भारताचा हा सामना जिंकून ५-१ अशी मालिका जिंकण्याचा इरादा आहे. तर यजमान दक्षिण आफ्रिका प्रतिष्ठा राखण्यासाठी आज खेळेल.
अपेक्षेप्रमाणे भारतीय संघात बदल झाला आहे. भुवनेश्वर कुमारच्या ऐवजी आज ११ जणांच्या भारतीय संघात शार्दूल ठाकूर संधी देण्यात आली आहे. मात्र मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक,मनीष पांडे, अक्षर पटेल, यांना या संपूर्ण मालिकेत एकदाही संधी देण्यात आलेली नाही.
असा आहे ११ जणांचा भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका संघ: एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स,इम्रान ताहीर, हेन्रिक क्लासेन, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, खाया झोन्डो, फरहान बेहार्डीन.






