भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात मंगळवारी (२८ जून) डब्लिन येथे दुसरा आणि अखेरचा टी२० सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ या टी२० मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अशात हा सामनाही जिंकत मालिका आपल्या नावावर करण्याच्या तयारीत भारतीय संघ मैदानावर उतरेल. तर आयर्लंडचा संघ सामना विजयासह मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तत्पूर्वी या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार ८.३० वाजता नाणेफेक झाली. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी निवडली आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल करण्यात आले आहे. दुखापतीशी झगडत असलेला ऋतुराज गायकवाडला या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. त्याच्याजागी संजू सॅमसनला संघात जागा दिली आहे. यासह जवळपास ४ महिन्यांनंतर त्याचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन झाले आहे. तसेच गोलंदाजी निभागात मागच्या सामन्यातील सामनावीर युझवेंद्र चहलच्या जागी रवी बिश्नोई आणि आवेश खानच्या जागी हर्षल पटेल यांना निवडले गेले आहे. तर आयर्लंडच्या संघात कोणताही बदल केला गेलेला नाही.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत: संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ऑल्फर्ट
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी
किती गोड! समायराने ‘क्यूट अंदाजा’त दिली वडील रोहितच्या तब्येतीविषयी अपडेट, Video तुफान व्हायरल
ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न