---Advertisement---

ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न

On: मंगळवार, जून 28, 2022 4:25 PM
r-ashwin-jadeja
---Advertisement---

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात १ जुलैपासून बर्मिंघम येथे पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत मालिकाही नावावर करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. तर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकत मालिका २-२ ने बरोबरीत संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशात दोन्हीही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतात. दरम्यान भारतीय संघाकडून अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

अनुभवाच्या जोरावर मिळेल का जागा?
अश्विनकडे (R Ashwin) कसोटी क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत ८६ कसोटी सामने खेळले आहेत. परंतु विदेशातील मैदानांवर अश्विनला खेळवण्याची फार कमी संधी दिली गेली आहे. विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या वेळचे संघ व्यवस्थापन अश्विनऐवजी रविंद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing Xi) खेळवण्यास प्राधान्य देत. परंतु आता कर्णधार आणि प्रशिक्षण स्टाफ दोन्हीही बदलल्याने अश्विनसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडे होऊ शकतात.

त्याने मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड केली गेली होती. परंतु त्याला चारही कसोटी सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती.

बर्मिंघमच्या खेळपट्टीवर असेल निर्भर
इंग्लंडच्या खेळपट्टींबद्दल बोलायचे झाल्यास, येथील खेळपट्टींपासून वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळते. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी केली होती. त्यामुळे खेळपट्टींबरोबरच ड्यूक चेंडूबद्दलही तक्रार व्यक्त केली गेली. अशात वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त फिरकी गोलंदाजांवरील जबाबदाऱ्या वाढल्या. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लिच यानेच लीड्समधील तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेत याचे संकेत दिले आहेत.

अशात बर्मिंघम येथे अश्विनला संधी जाईल की नाही, हे तेथील खेळपट्टी आणि परिस्थितींवर निर्भर असेल. जर येथील खेळपट्टी आणि परिस्थिती न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांप्रमाणे राहिली, तर भारतीय संघाकडून २ फिरकी गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतात. परंतु जर परिस्थिती याउलट राहिली तर, भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. ज्यामुळे पुन्हा एकदा अश्विनला बाकावर बसावे लागू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पंत-द्रविड पाठोपाठ पंड्या-लक्ष्मण जोडीचा ‘या’ खेळाडूवर अविश्वास; दुसऱ्या सामन्यात तरी मिळणार का संधी?

रोहितच्या अनुपस्थितीत कोणीही असेल कर्णधार, पण विराट नाही; बालपणीच्या प्रशिक्षकाचेच वक्तव्य

ICC WTC: न्यूझीलंड हरला, भारताला टेंशन देऊन गेला; जाणून घ्या काय आहे समीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---