---Advertisement---

सांगलीकर स्मृती मानधना न्यूझीलंड विरुद्ध चमकली, मिळवून दिला टीम इंडियाला पहिला विजय

On: गुरूवार, जानेवारी 24, 2019 12:42 PM
---Advertisement---

नेपीयर। भारतीय महिला संघाची न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका आजपासून(24 जानेवीरी) सुरु झाली आहे. आज पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात प्रतिभावान फलंदाज स्मृती मानधनाने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांनी भारतीय महिला संघासमोर प्रथम फलंदाजी करताना 193 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मानधना आणि जेमिमा रोड्रीगेजने पहिल्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली.

मात्र भारताला विजयासाठी फक्त 3 धावांची गरज असताना मानधना बाद झाली. तिला एमिली केरने बाद केले. पण त्यानंतर रोड्रीगेज आणि दिप्ती शर्मा यांनी भारताचा विजय निश्चित केला.

मानधनाने या सामन्यात 104 चेंडूत 105 धावा केल्या. या खेळीत तिने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. तर रोड्रीगेजने 94 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत तिने 9 चौकार मारले.

मानधनाचे हे वनडे क्रिकेटमधील चौथे शतक ठरले आहे. तसेच ती हे सर्व शतके तिने भारताबाहेर केली आहेत. तसेच ती ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंडमध्ये वनडे शतक करणारी क्लेर टेलर नंतरची केवळ दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. भारताकडून एकता बिश्त आणि पूनम यादवने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तसेच दिप्ती शर्माने दोन आणि शिखा पांडेने एक विकेट घेतली. यामुळे न्यूझीलंडचा डाव 48.4 षटकात 192 धावांवरच संपुष्टात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला टीम इंडियाचा सदस्य आता खेळणार रणजी सामने

दिग्गज खेळाडू म्हणतो, रिषभ पंत विश्वचषकात नकोच

NZvsIND: टी२० मालिकेबरोबरच शेवटचे दोन वनडेही खेळणार नाही विराट कोहली, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment