---Advertisement---

हॉकीमध्ये भारतीय महिलांचा दमदार विजय; वंदना बनली ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

On: शनिवार, जुलै 31, 2021 10:57 AM
---Advertisement---

शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने ४-३ ने जिंकला. तसेच वंदना कटारियाने एक विक्रमही आपल्या नावावर केला. याबरोबरच भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या आशा वाढल्या आहेत.

सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये भारताच्या वंदना कटारियाने चौथ्या मिनिटाला अप्रतिम गोल करत आघाडी मिळवून दिली होती. ‘करो या मरो’ सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरच्या १५ व्या मिनिटांपर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कायम राखलेली १-०ची आघाडी शेवटच्या क्षणाला गमावली. (India women’s hockey team defeat South Africa)

दक्षिण आफ्रिकेच्या ग्लासबी टेरिन क्रिस्टीने १५ व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. याच मिनिटादरम्यान भारताला आपला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाही. पहिला क्वार्टर १-१ अशा बरोबरीत राहिला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आघाडी घेतली. यादरम्यान १७ व्या मिनिटाला वंदनाने पेनल्टी कॉर्नला गोलमध्ये बदलले आणि आपला दुसरा गोल केला. यामुळे भारताने २-१ ने आघाडी घेतली.

भारतीय महिला संघाने या महत्त्वाच्या सामन्यातही विरोधी संघाला पुनरागमन करण्याची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या हंटरने गोल केला. भारताने आपली आघाडी पुन्हा एकदा गमावली. दक्षिण आफ्रिकेने ३० व्या मिनिटाला गोल करत दुसऱ्या क्वार्टरनंतर २-२ अशी बरोबरी साधली.

भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल केला. नेहा गोयलने ३२ व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. हा गोल पेनल्टी कॉर्नरमार्फत आला. पूल एमध्ये भारतीय संघाचा हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे भारताला या सामन्यात काही केल्या विजय मिळवायचा होता.

भारताने आपली तिसऱ्यांदा आघाडी कायम राखण्याची संधी गमावली. दक्षिण आफ्रिकेने सामन्यातील तिसरा गोल केला आहे. या गोलसह दक्षिण आफ्रिकेने ३-३ ने बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेकडून ३७ व्या मिनिटात मेरीझेन मराईसने गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची कामगिरी फार चांगली ठरली नाही.

भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. भारताकडून चौथा गोल वंदनाने केला. तिने सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवरून गोल केला. विशेष म्हणजे वंदनाचा हा सामन्यातील तिसरा गोल आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात वंदनाने कमालीचे प्रदर्शन केले. तिने चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला तीन गोल करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. वंदना ही ऑलिंपिकमध्ये तीन गोल करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू बनली.

तसेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुन्हा ४-३ ने आघाडी घेत विजय मिळवला. यासह भारताने टोकियो ऑलिंपिक्समधील आपला दुसरा विजय मिळवला आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक

-भारताच्या आशा धूळीत! अव्वल बॉक्सर अमित पंघलला रिओ ऑलिंपिक विजेत्या मार्टिनेझने दिली ऑलिंपिक पदार्पणात मात

-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---